मराठी

प्रेमभंगातून जेव्हा व्यवसाय उभा राहतो…

डेहराडून/दि २१ – प्रेम भंग झाला, की अनेक जण मृत्यूला जवळ करतात. काही लोक मद्याच्या आहारी जातात. काहींवर मानसिक परिणाम होतो. आघात सहन न झाल्याने काही नैराश्यात जातात. प्रेमभंगाचे दुःख मोठे असते. त्यातून सावरावे लागते. डेहराडूनच्या एका युवकाने आपल्या प्रेमभंगाचे नाव एका कॉफी हाऊस देऊन प्रेमभंगातून व्यवसायवृद्धीचा अनोखा मार्ग शोधला आहे.
डेहराडूनच्या 21 वर्षीय दिव्यांशू बत्रानाही असाच प्रेमभंग झाला. त्याची शालेय जीवनापासूनची एक मैत्रीण होती. तिच्यावर त्याचे जीवापाड प्रेम होते. तिचेही त्याच्यावर प्रेम होते. दोघांना विवाह करायचा होता; परंतु तिच्या आईवडीलांना त्यांचे प्रेमसंबंध मान्य नव्हते. त्यामुळे गेल्या वर्षी मोठ्या दुखद अंतकरणाने तो तिच्यापासून दूर झाला. त्यानंतर दिव्यांशू काही महिने उदास राहिला. तो पबच्या आहारी गेला. त्यात त्याचा वेळ वाया जायला लागला. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी दिव्यंशूने काहीतरी करण्याचा निर्णय घेतला.
डेहरादूनच्या जीएमएस रोडवर त्याने ’दिल टूटा आशिक-चाय वाला’ या नावाने कॅफे सुरू केला. या कॅफेची सुरुवात त्याने आपल्या भावासोबत केली. या कॅफेचे नाव वाचून लोक आकर्षित व्हावेत, अशी त्यांची इच्छा होती. हार्टब्रोकेन आशा चायवाला हे कॅफे दिव्यांशूने स्वत: च्या बचतीतून उघडले. या कॅफेद्वारे त्याला त्याच्यासारख्या ब्रेकअपमध्ये गेलेल्यांना मदत करायची आहे. दिव्यांशू म्हणतो, की असे बरेच लोक आहेत, जे माझ्यासारख्या ब्रेकअपच्या वेदनेतून गेले आहेत. मला अशी इच्छा आहे, की अशा लोकांनी येथे यावे आणि त्यांचे दुःख वाटून घ्यावे. त्यांना ब्रेकअपमधून बाहेर पडण्यास हे अनुभवाचे क्षण मदत करतील. दिव्यांशूच्या ब्रेकअपची कहाणी आणि या कॅफेचे नाव दोघेही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोक दिव्यांशूच्या कार्याचे कौतुक करीत आहेत.

 

Related Articles

Back to top button