मराठी

ठोक महागाईत १.५५ टक्के वाढ

नवीदिल्ली/दि.१४  – मासिक आधारावर एकूण वस्तूंच्या निर्देशांकात 0.30 टक्के वाढ झाली. घाऊक किंमत निर्देशांक (WPI) आधारित चलनवाढ मासिक आधारावर नोव्हेंबरमध्ये 1.55 टक्क्यांवर गेली. ऑक्टोबरमध्ये ती 1.48 टक्के होती. ऑक्टोबरचा आकडा आठ महिन्यांच्या उच्चांकावर होता. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये घाऊक महागाई 2.26 टक्के होती. नोव्हेंबरमध्ये होलसेल चलनवाढीची वाढ झाल्यामुळे तयार झालेल्या वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, महागड्या खाद्यपदार्थामुळे ठोक महागाईचा दर 0.58 टक्के होता. खाद्यपदार्थाचा अर्थ येथे मासे, मांस, भाज्या आहेत. इंधन आणि वीज महागाई खाली  आली आहे. उद्योग व अंतर्गत व्यापार विभागाने (डीपीआयआयटी) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबरमध्ये अन्नधान्य चलनवाढीचा दर 3.9४ टक्के होता. तर ऑक्टोबरमध्ये  ६.37 टक्के होता. यामध्ये भाज्या आणि बटाट्यांच्या किंमती वाढल्या आहेत. महिन्यात भाजीपाल्याच्या किमती १२.२4 टक्क्यांनी आणि बटाट्याच्या किंमती ११.1.१२ टक्के वाढल्या. प्राथमिक वस्तूंचा महागाई दर २.72 टक्के आहे. ऑक्टोबरमध्ये ती 4.74 टक्के होती. डब्ल्यूपीआयमध्ये त्याची 22.६2 टक्के हिस्सेदारी आहे. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील महागाई -9.87 टक्के आहे.  ऑक्टोबरमध्ये ती -10.95 टक्के होती. नोव्हेंबरमध्ये नॉन-फूड आर्टिकल चलनवाढीचा दर 8.43 टक्के राहिला. ऑक्टोबरमध्ये 2.12 टक्क्यांच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये तयार वस्तूंची महागाई 2.97 टक्के होती. मासिक आधारावर एकूण वस्तूंच्या निर्देशांकातही ०.3० टक्के वाढ झाली. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित किरकोळ महागाई दर 6.8 टक्के होता.

Related Articles

Back to top button