मराठी

‘एम्स’ ऐवजी शाह यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार का?

खा. थरूर यांचा सवाल; सरकारी रुग्णालयावर विश्वास नसल्याचे संकेत

नवीदिल्लीः- गेल्या सुमारे साडेचार महिन्यांपासून देशाच्या कोरोनाविरोधातील लढय़ाची सूत्रे  हलविणारे केंद्रीय गृहमंत्रालयाचे प्रमुख अमित शाह यांना संसर्ग झाला आहे. त्यांना रविवारी उत्तर प्रदेशमधील गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शाह यांनी दिल्लीमधील ‘ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ (एम्स) रुग्णालयामध्ये उपचार घेण्याऐवजी शेजारील राज्यातील खासगी रुग्णालयाची निवड का केली असा प्रश्न काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी उपस्थित केला आहे.

शाह यांना ताप किवा कोरोनाची अन्य लक्षणे नसली, तरी त्यांना कालपासून थकवा जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांनी चाचणी केली. शाह यांना मधुमेह असल्याने त्यांनी डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहणे आवश्यक असल्याने त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे; मात्र दिल्लीतील ‘एम्स’ऐवजी शेजारच्या उत्तर प्रदेशमधील खासगी रुग्णालयात उपचार घेण्याच्या शाह यांच्या निर्णयावर थरूर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
थरूर यांच्या एका फॉलोअरने त्यांना भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा एक फोटो ट्विट करत नेहरूंच्या नेतृत्वाखाली दूरदृष्टीने ‘एम्स’ची स्थापना करण्यात आल्याचे ट्विट केले. या ट्विटला रिट्विट करून त्यावर थरूर यांनी प्रतिक्रिया नोंदवली. “खरोखरच, मला प्रश्न पडला आहे, की आपल्या गृहमंत्र्यांनी उपचारासाठी ‘एम्स’ऐवजी शेजारच्या राज्यातील खासगी रुग्णालयाची निवड का केली असावी. सार्वजनिक संस्थांवरील लोकांचा आत्मविश्वास वाढवायचा असेल, तर प्रभावशाली व्यक्तींनी अशा संस्थांना पाठिंबा दाखवण्याची आवश्यकता असते,” असे थरूर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. थरूर यांच्या या ट्विटवरून आता भाजप समर्थक आणि काँग्रेस समर्थकांमध्ये ‘सोशल नेटवर्किंग’वर चर्चा रंगली आहे. भाजप समर्थकांनी काँग्रेसचे नेते उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल किंवा डिस्चार्ज झालेल्या बातम्यांचे स्क्रीनशॉर्ट शेअर केले आहेत, तर काँग्रेस समर्थकांनी थरूर यांचा मुद्दा योग्य असल्याचे म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button