-
शेतकऱ्याने दगड फेकून मारल्याने वाचले प्राण
-
शिंदी बुद्रुक येथील घटना
परतवाडा तालुका प्रतिनिधी : आपल्या वडिलांसोबत जाऊन कुरान सोबत चारा घेऊन परत येत असताना एका अल्पवयीन मुलावर जंगले डुकराने हल्ला करून त्याला घायाळ केले तेथीलच एका शेतकऱ्याने दगड फेकून मारल्याने त्या मुलाचे प्राण वाचले अचलपूर तालुक्यातील शिंदी बुद्रुक येथे ही हृदयद्रावक घटना आज सायंकाळी घडली
कृष्णा दिलीप माहुरे वय तेरा वर्षे असे डुकराच्या हल्ल्यात घायाळ झालेल्या मुलाचे नाव असून आपल्या वडिलांसोबत तो शेतात गेला होता पाळीव जनावरांसाठी चारा डोक्यावर घेऊन परत येत असताना गावाजवळच लहाने यांच्या शेतातील टावर जवळ एका डबक्यात जंगली डुक्कर लोळत होते कृष्णा डोक्यावर ओझे घेऊन तेथून जात असताना त्या डुकराने कृष्णावर अचानक हल्ला चढविला त्याच्या डोक्याला मांडीला पोटाला कमरेला तसेच डोक्याला जबर चावा घेऊन त्याच्या नरडीचा घोट घ्यायचा ते डुक्कर प्रयत्न करू लागले तेवढ्यात सोमेश्वर पाटील लहाने या शेतकऱ्यांनी हा प्रकार पाहिला व ते घाबरून गेले परंतु पळून न जाता त्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी त्या डुकराला दगड फेकून मारले काही का होईना अखेर ते डुक्कर त्या मुलाला सोडून जंगलात पळून गेले गंभीर जखमी अवस्थेत कृष्णाला त्याच्या घरी आणण्यात आले व तात्काळ माजी ग्रा प सदस्य सूनील रोडे छोटू दमाहे यांनी गजानन महाराज संस्थान चे अध्यक्ष राजेंद्र पवार यांची भेट घेऊन संस्थांची रुग्णवाहिका देण्याची विनंती केली राजेंद्र पवार यांनी लगेच रुग्णवाहिका चालकाला बोलून रुग्णवाहिका कृष्णाच्या घरी पाठवत कृष्णाला त्याच रुग्णवाहिकेतून अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले कृष्णा हा जिवाच्या आकांताने ओरडत होता त्याच्या शरीरावरील जखमा पाहून अनेकांचे काळीज पाझरले कृष्णा सर्वांच्या ओळखीचा असून गावात तो हसत खेळत बागडणारा एक चांगला सोज्ज्वळ मुलगा म्हणून प्रचलित आहे त्याच्या अशा अचानक झालेल्या आघातावर संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे