मराठी

चार सरकारी बँकांचे खासगीकरण करणार

पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांनी या संदर्भात निर्देश दिले

नवीदिल्ली/दि.२० – केंद्र सरकारने चार सरकारी बँकांना खासगी हातात सोपवण्याची प्रक्रिया वेगवान केली आहे. पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांनी यासंदर्भात निर्देश दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. सरकार पंजाब अँड सिंध बँक, बँक ऑफ महाराष्ट्र (BOM), युको बँक आणि आयडीबीआय(IDBI) बँकेत आपली हिस्सेदारी विकू इच्छित आहे. सरकार या बँकांची हिस्सेदारी विकून कोरोना विषाणूमुळे कर संकलनातील तोट्याची भरपाई करू इच्छिते. यासाठी काही अन्य बँकांमध्येही सरकारी हिस्सेदारी विकली जाऊ शकते. पीएमओने वित्त मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात या वित्त वर्षात चारही बँकांची खासगीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे. असे असले तरी केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.

Back to top button