मराठी

मेळघाटातील शिक्षक प्रकाश काळबांडेंच्या पाठिशी

धारणी-चिखलदरा परिसरातील शिक्षकांचा संकल्प

  • प्रचार दौऱ्याला उदंड प्रतिसाद

अमरावती दि २६- शिक्षकांची सर्वात जुनी आणि मोठी संघटना असलेल्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या अधिकृत उमेदवारीवर अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात निवडणूक लढवित असलेले प्रकाश काळबांडे यांचा मेळघाट प्रचार दौरा आज पार पडला आहे. अनेक वर्षांपासून उपेक्षित राहिलेल्या आदिवासी आश्रमशाळा तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन प्रकाश काळबांडे यांच्याच पाठिशी राहण्याचा संकल्प केला आहे.
प्रकाश काळबांडे यांनी आज मेळघाटातील शाळा भेट दौरा केला. मेळघाटातील जेष्ठ सहकार नेते नानासाहेब भिसे यांचे आशिर्वाद घेऊनच त्यांनी आपल्या पुढील दौऱ्याला सुरूवात केली. मेळघाटातून सर्वाधिक मते आजवर विमाशि संघालाच मिळत आलेली असून विमाशिची मोठी फळी मेळघाटात कार्यरत आहे. त्यामुळे प्रकाश काळबांडे यांच्यासाठी हा परिसर सुरूवातीपासूनच जमेची बाजू आहे. त्यामुळेच त्यांनी आज मेळघाटात कार्यरत शिक्षकांशी हितगुज करण्यासाठी परिसरातील शाळांना भेटी दिल्या. यामध्ये विविध शासकीय आदिवासी आश्रमशाळा, खासगी अनुदानित आश्रमशाळा तसेच जिल्हा परिषद तसेच अन्य शाळांना भेटी दिल्या. मेळघाटातील अतिशय दुर्गम भागात जाऊन त्यांनी शिक्षकांची विचारपूस केली तसेच शिक्षण क्षेत्रात जाणाऱ्या अडचणी समजावून घेतल्या. यावेळी दुर्गम भागातील शिक्षकांच्या समस्या तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने विमाशि संघाने पावले उचलावीत अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली. यावेळी काळबांडे यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत आपण सर्व समस्या निकाली काढू असे सांगितले.
काळबांडे यांनी केलेल्या दौऱ्याच्या वेळी विविध शाळांमधील शिक्षकांनी गर्दी करून त्यांचे स्वागत केले. यावेळी काळबांडे यांच्या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद शिक्षकांकडून मिळत होता. मेळघाटातील शिक्षक विमाशिसंघाच्याच पाठिशी असून असा विश्वास शिक्षकांनी यावेळी दिला.

  • दुर्गम भागातील शिक्षकांना सोईसुविधा देऊ

मेळघाट तसेच अन्य दुर्गम भागात हजारो शिक्षक विविध शाळांमध्ये कार्यरत असून त्यांना कुठल्याही सोईसुविधा तसेच संरक्षण नाही. तरी देखील मोठ्या जोखमीने शिक्षक ज्ञानदानाचे काम करत असतात. त्यामुळे शिक्षकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्पवूर्ण पावले आपण उचलू असे ठोस आश्वासन काळबांडे यांनी यावेळी दिले. मेळघाटातील शिक्षकांना त्यांच्या शाळांमध्ये विविध निवास तसेच अन्य सोईसुविधा आपण निवडून आल्यानंतर देऊ असेही काळबांडे यांनी शिक्षकांशी संवाद साधताना सांगितले.

Related Articles

Back to top button