वरुड ता.प्रतिनिधी/२३ ऑगस्ट – बेनोडा (शहीद) पोलीस स्टेशन (Police station)अंतर्गत येणा:या खडका येथील सुमन गोविंदा आहाके वय ५५ हिने सततच्या आजारपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या (Suicide by strangulation) केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
सुमन आहाके ही महिला गेल्या पाच दिवसांपासून घरुन बेपत्ता होती. सततच्या आजाराला ती कंटाळलेली होती. कुटुंबियांनी सर्व दिशांनी तपासणी केली मात्र तिचा ठावठिकाणा लागला नाही. आज सकाळी खडका येथील गुराखी व शेतमजूर शिवारात गेले असता उग्र वासाच्या दिशेने गेले असता संबंधित महिला त्यांना एका झाडावर गळफास लावून लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. गावात शोध घेतला असता ती महिला सुमन आहाके असल्याचे निश्पन्न झाले. मृतदेहाच्या अवस्थेवरुन तिने चार पाच दिवसांआधी आत्महत्या केल्याचे दिसून येते.
पोलीस पाटील विजय गेडाम यांनी बेनोडा पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली असता पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बेनोडा पोलीस करीत आहेत.