महिला अजूनही आर्थिक पारतंत्र्यात
मुंबई दि १५ – महिला अजूनही स्वतःचे आर्थिक निर्णय स्वतः घेत नाहीत. त्यांचे निर्णय आईवडीलांच्या इच्छेने घेतले असतात. 1,2500 महिलांवर करण्यात आलेला सर्वेक्षणानुसार एकट्या स्त्रिया स्वतःचे आर्थिक निर्णय घेत नाहीत. 28 टक्के महिला या प्रकरणात वडिलांवर अवलंबून असतात, तर पाच टक्के महिलांना असा असा विश्वास आहे, की त्यांचे निर्णय आईच्या इच्छेनुसार घेतले जातात.
या सर्वेक्षणात मुंबई, बंगळूर, दिल्ली, पुणे, जयपूर, कोलकाता, इंदूर आणि हैदराबादमधील महिलांचा समावेश होता. अविवाहित किंवा विवाहानंतर पतीपासून विभक्त झाल्यानंतर 69 टक्के महिला त्यांच्या आर्थिक निर्णयांसाठी वडिलांवर अवलंबून असतात. हे सर्वेक्षण 25 ते 54 वर्षे वयोगटातील 1,250 महिलांवर करण्यात आले. एलएक्सएमईच्या मते, 91 टक्के महिला आपल्या मुलांना आर्थिक नियोजनाबाबत शिकवतात आणि 86 टक्के महिलांना असा विश्वास आहे की, त्या आपल्या मुलांना पैशाच्या चंगल्या विनियोजनाचा सल्ला देतात. दहा पैकी नऊ महिलांनी आपल्या मुलांना पिगी बँका दिल्या आहेत. त्यामुळे ते पैशाची बचत करू शकतील आणि बचत करण्याचे महत्त्व जाणून घेतील.
..