मराठी

कनेयिटव्हीमध्ये महिला मागेच

नवी दिल्ली/दि. ८ – गेल्या दशकात जगाने टू जी, थ्री जी, फोर जी पर्यंत वाटचाल केली. कीपॅड फोनची जागा अर्ध-स्मार्टफोन आणि नंतर स्मार्टफोनने घेतली; परंतु या सर्वांच्या मध्यभागी, कनेयिटव्हिटीमध्येअसमानता आढळली. वर्ल्डइकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूईएफ) च्या तज्ज्ञांचे म्हणणे आहेकी, फाईव्ह जीच्या आगमनाने कनेयिटव्हिटीतील असमानता कमी होईल किंवा कनेयिटव्हिटीमध्येसमानता येईल. यासाठी व्हिरझोन आणि डब्ल्यूईएफ एकत्रितपणेकाम करत आहेत.
वास्तविक जगात आणि आपल्या समाजात अनेक प्रकारची समानता आहे. भिन्न जाती, धर्म, समुदाय आणि लिंग यांच्यातील असमानतेमुळे काही लोक सर्व प्रकारच्या हक्क व सुविधांमध्ये पुढे आहेत तर काही लोक मागे राहतात. म्हणजेच समानता संपते, याला सामाजिक समता किंवा सामाजिक असमानता म्हणतात. कनेयिटव्हिटीमधील अशा फरकास कनेयिटव्हिटीमधील असमानता असेम्हणतात. जगभरात पुरुषांपेक्षा स्त्रियांकडे कमी मोबाईल आहेत. पुरुषांच्या तुलनेत 21 टक्के महिलांकडे मोबाईल असण्याची शययता कमी आहे. पाच वर्षांपेक्षा जास्त वयाच्या एकूण 45 कोटी लोकांकडे इंटरनेट सुविधा आहे. त्यात पुरुषांची संख्या 28 कोटी आहे, तर महिलांची संख्या 14 कोटी आहे. डिजिटल प्रवेश वाढवून कनेयिटव्हिटीमधील असमानता कमी होईल.
डब्ल्यूईएफ जगातील डिजिटल प्रवेशास प्रोत्साहन देऊन सामाजिक विषमता कमी करण्यासाठी पुढाकार घेत आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (यूएन) संघटनेच्या आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेच्या म्हणण्यानुसार, कनेयिटव्हिटी अवघ्या काही वर्षांत जगातील निम्म्या लोकसंख्येपर्यंत पोहोचली आहे; परंतु त्यातही प्रचंड असमानता आहे. उदाहरणार्थ, युरोपमधील 80 टक्के लोक इंटरनेट वापरतात. आफ्रिकेत तीस टक्क्यांपेक्षा कमी लोकांकडे इंटरनेट सुविधा आहे. जगातील एकूण कनेयिटव्ह लोकांमध्ये गरीब लोकांची संख्या, शिक्षित नसलेली माणसेआणि स्त्रिया कमी आहेत. डब्ल्यूईएफला हेअंतर कमी करायचे आहे. डब्ल्यूईएफ तज्ज्ञांच्या मते, आता जगाच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म सर्वांत महत्त्वाचे झालेआहे. अशा परिस्थितीत जर जगातील कोणत्याही समाजातील कनेयिटव्हिटी असमान राहिली तर त्याचा थेट परिणाम त्या समाजातील लोकांच्या आर्थिक विकासावर होईल. नंतर या आर्थिक मागासलेपणामुळेजगातील आर्थिक असमानता आणखीच वाढेल. हा विचार लक्षात घेऊन डब्ल्यूईएफ या उपक्रमाची तयारी करत आहे. डब्ल्यूईएफच्या मते, जगातील टेक इंडस्ट्रीची भूमिका या उपक्रमात महत्त्वाची ठरणार आहे. टेक कंपन्यांच्या मदतीने गरीब, मागास, अशिक्षित आणि महिलांना स्वस्तात इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली जाईल. या कामात डब्ल्यूईएफ सरकारांची मदतही घेईल.

Related Articles

Back to top button