मालगाडीचे नियंत्रण महिलांकडे
मुंबई/दि.७ – महिलांनी रेल्वे इंजिन चालक, वैमानिक, अंतराळ वीर, लष्कर आदी सर्वंच क्षेत्रे व्यापली असली, तरी
महिलांनी भारतीय रेल्वेच्या इतिहासात नवा विक्रम नोंदविला. रेल्वेमध्ये पहिल्यांदाच पायलटपासून मालगाडीच्या गार्डपर्यंत सर्वच महिला होत्या. मालगाडीची सर्व जबाबदारी महिलांनीच सांभाळली. एकीकडे रेल्वेत दुमजली मालगाडी दाखल झाली असताना दुसरीकडे महिलांनी मालगाडीची जबाबदारी व्यवस्थित निभावली.
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसई रायड स्थानकातून मंगळवारी गुजरातमधील वडोदरा येथे मालगाडी आली. तिचे नियंत्रण महिलांच्या हाती होते. लोको पायलट कुमकुम एस. डोंगरे (वय 34), सहाय्यक लोको पायलट उदिता वर्मा (वय 28) आणि गार्ड आकांक्षा रे (वय 29) यांच्यावर या मालगाडीची जबाबदारी होती. मालगाडीमध्ये पायलटपासून गार्डपर्यंतच्या सर्व महिला होत्या. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता 43 बंद वॅगनमध्ये सहा हजार ६८६ टन टन वाहून नेणारी मालगाडी सहा तासानंतर वडोदरा येथे पोहोचली. महिला पायलटने ती सुमारे 60 किलोमीटर प्रतितास वेगाने चालविली.
पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी सांगितले, की पश्चिम रेल्वेने आणखी एक परंपरा शोधून काढली आहे, जी इतिहासात नोंदली गेली आहे. कोणतेही काम आपल्या क्षमतेच्या पलीकडे नसल्याचे एक उदाहरण स्त्रियांनी घालून दिले आहे. काही वर्षांपूर्वी पश्चिम रेल्वेला उपनगरी ट्रेन चालवण्याची आज्ञा प्रीती कुमारी यांनी दिली होती.