महिला करणार ट्रॅक्टर परेडचे नेतृत्व

नवी दिल्ली/दि. ६ – कृषी कायदे रद्द करण्याच्या अर्जावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी 11 जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. तथापि, न्यायालयाने आपल्याला शेतक-यांची परिस्थिती समजली आहे, अले मत व्यक्त केले. दुसरीकडे खराब हवामानामुळे शेतक्यांनी आता उद्या (ता. 7) दिल्लीभोवती ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या ट्रॅक्टर परेडचे नेतृत्व महिला करणार आहेत.
26 जानेवारीच्या ट्रॅक्टर परेडचे नेतृत्व २५० महिला करणार आहेत सिंघू सीमेवरील शेतक-यांनी सांगितले, की सरकारने कृषी कायदे मागे न घेतल्यास ते 26 जानेवारी रोजी दिल्लीत ट्रॅक्टर परेड घेतील. या परेडचे नेतृत्व पंजाब आणि हरियाणा येथील महिला करतील. हरियाणामधील सुमारे 250 महिला ट्रॅक्टर चालवण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. आठ जानेवारी रोजी शेतकरी सरकारशी चर्चा करतील. शेतकरी आणि सरकार यांच्यात चार जानेवारीची बैठक कोणताही निर्णय न होताच संपली. पुढच्या बैठकीतव कृषी कायदे मागे घ्यावेत आणि किमान हमी भावासाठी स्वतंत्र कायदा करण्याची मागणी केली जाईल. चर्चेची ही नववी फेरी असेल. यापूर्वी सातव्या फेरीतील बैठकीत शेतक-यांच्या केवळ दोन मागण्यांवर सहमती दर्शविण्यात आली होती. इतर सर्व बैठका निष्फळ ठरल्या.
शेतक्यांनी टिकर सीमेवर पावसापासून संरक्षणासाठी पक्की बांधकामे सुरू केली. प्रदीर्घ आंदोलन पाहून शेतक-यांनी सीमेवर विटेची बांधकामे बांधण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी पडलेल्या पावसामुळे त्यांचे तंबू खाली कोसळले होते. आंदोलक शेतकरी रस्त्याच्या मधोमध पक्की कार्यालयेही बांधत आहेत. आता ते येथेही गुरे आणण्याची तयारी करीत आहेत. पंजाबमधील फतेहगड साहिबमधील रुड़की खेड्यातील शेतकरी गुरदर्शन सिंह (वय 48) यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दिल्लीतील चळवळीत ते सामील झाले. त्याचा मुलगा म्हणाला, की तीन जानेवारीला दिल्लीत वडिलांची तब्येत बिघडल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी पाठवले. येथेच त्याचा मृत्यू झाला.
रिलायन्स जिओने शेतकरी चळवळीच्या दरम्यान दूरसंचार नेटवर्कला हानी पोहचविणे व स्टोअर जबरदस्तीने बंद करण्याच्या विरोधात पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने पंजाब सरकार आणि केंद्र सरकारला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. पुढील सुनावणी आठ फेब्रुवारी रोजी होईल.