मराठी

मनपात “स्‍वच्‍छ सर्वेक्षण २०२२” बाबत कार्यशाळा

अमरावती महानगरपालिका, अमरावती

अमरावती/दी १४- मंगळवार दिनांक १४ डिसेंबर,२०२१ रोजी दुपारी १२.०० वाजता स्वच्छ भारत अभियान अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण २०२२”, स्टार रेटिंग, ODF++/वॉटर + या अनुषंगाने विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे स्वच्छता विभागामार्फत सर्व जेष्ठ स्वास्थ निरीक्षक, स्वास्थ निरीक्षक यांना माहितीस्पर मार्गदर्शन प्राप्त व्हावे या अनुषंगाने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेकरीता स्वच्छ भारत अभियान शहर समन्वयक डॉ. श्वेता बोके, सर्व जेष्ठ स्वास्थ निरीक्षक व स्वास्थ निरीक्षक उपस्थित यांची उपस्थिती होती. या कार्यशाळेकरीता वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) यांचेकडून मार्गदर्शन करण्यात आले. स्‍वच्‍छ सर्वेक्षणात २०२२ मध्ये अमरावती शहरातील नागरीकांचा सहभाग हा अतिशय महत्‍वाचा राहणार आहे. या सर्वेक्षणात अमरावती शहराकरिता स्‍टार रँकींग हि महत्‍वाची बाब ठरणार आहे. तसेच अमरावती शहर वॉटर प्लस शहर होण्याच्या अनुषंगाने प्रयत्नशील आहे. शहरातील सर्व नागरीकांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा करुन घंटीगाडीतच टाकावा. स्‍वच्‍छता तक्रारी निवारण बाबत सर्व नागरीकांनी शासनाचे स्‍वच्‍छता MOHUA अॅप प्‍ले-स्‍टोरवर जावून डाऊनलोड करावे. या सर्वेक्षणात नागरीकांचा सकारात्मक फिडबॅक सुद्धा अतिशय महत्‍वाची बाब आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये शहरातील जेष्ठ नागरिक व तरुणांना जास्तीत जास्त प्रमाणात स्वच्छ भारत अभियानामध्ये समाविष्‍ट करून घेणे अत्यंत आवशयक आहे याशिवाय NGO, बचत गट, धार्मिक संस्था, स्वातंत्र्य सैनिक, खेळाडू, महिला वर्ग इत्यादी सर्वांनी स्वच्छतेप्रति जागरूकता बाळगून सर्वेक्षण मध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. यावेळी स्‍वच्‍छ सर्वेक्षण २०२२ हे एकूण ७५०० गुणांचे आहे. शहरातील कचरा उचलणा-याची माहिती देणे आवश्‍यक राहणार आहे व अशा व्‍यक्‍तींना ओळखपत्र देण्‍यात येणार आहे. सफाई कामगारांना पर्सनल प्रोटेक्‍शन इक्‍युपमेंट देणे गरजेचे राहणार आहे. प्रत्येक महिन्‍याला स्वच्छता कामगारांसाठी आरोग्य शिबीर घेण्‍यात येत आहे. प्रत्‍येक हॉटेल व्यावसायिकांनी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रोसेसींग युनिट तयार करुन त्‍याद्वारे खत निर्मिती करावी. शौचालयात पाण्‍याच्‍या व्‍यवस्‍थेबाबत माहिती देण्‍यात यावी. ज्‍या ठिकाणी बांधकाम सुरु आहे अशा ठिकाणी शौचालयाचे व्‍यवस्‍था करणे गरजेचे आहे. स्‍वच्‍छ सर्वेक्षण मध्‍ये रॅली काढून त्‍यात नागरीकांचा मोठया प्रमाणात सहभाग महत्‍वाचा आहे. स्‍वच्‍छ सर्वेक्षण संबंधित कर्मचारी यांनी ई-लर्निंग कोर्सेस करणे अनिवार्य आहे. स्‍वच्‍छता विभागातील कर्मचारी यांना स्‍वच्‍छ महाराष्‍ट्र अभियान (नागरी) अंतर्गत स्‍वच्‍छ सर्वेक्षणाच्‍या कार्यशाळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे. प्‍लास्टिक बंदी संदर्भात कार्यवाही करुन जास्‍तीत जास्‍त प्रमाणात सिंगल युज प्‍लास्‍टीक बंदी करावयाची आहे. या सर्वेक्षणात इनोवेशन आणि बेस्‍ट प्रॅक्टिसला फार महत्‍व आहे. जनजागृती च्‍या अनुषंगाने स्‍वच्‍छ सर्वेक्षण २०२२ चे होर्डींग व बॅनर्स शहरात लावणे आवश्‍यक आहे. स्‍वच्‍छ सर्वेक्षण २०२२ सुरु झाले आहे याची माहिती नागरीकांना देण्‍यात यावी व भरपूर प्रमाणात नागरीकांना यात समाविष्‍ट करण्‍यात यावे.  प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम-सर्व प्रकारच्या सण / सामाजिक सभा/कार्यक्रमांच्या दरम्यान ७५ मायक्रॉन पेक्षा कमी आकाराच्या प्लास्टिकसह एकल वापर प्लास्टिक वर बंदी घालणे. सर्व स्वच्छता कर्मचारी यांचे करीता आरोग्य शिबिर, प्रत्येक महिन्यामध्ये उत्कृष्ठ स्वच्छता कामगार/वाहन चालक यांना सन्मानित करणे,स्वच्छता कर्मचा-यांकरीता प्रशिक्षण आयोजित करणे. स्वच्छता कर्मचा-यांना किमान तीन सरकारी योजनांचा लाभ देणे. सर्व शौचालय सीट्स आणि मुत्रीघर नेहमी स्वच्छ आणि वापरण्या योग्य असाव्यात,शौचालयात महिला व पुरुष यांचे करिता स्वतंत्र सुविधा व स्वतंत्र प्रवेश उपलब्ध, शौचालयाचे फ्लोरिंग स्वच्छ व कोरडे असावेत, विद्युत पुरवठा व पाणी उपलब्ध असावे, सर्व दरवाज्यांना बंद करण्याकरिता कार्यान्वित कुंड्या असाव्यात, पुर्णवेळ सफाई कर्मचारी उपलब्ध असावेत तसेच तेथील सफाई कामगारांना स्वयं सुरक्षा साहित्य (PPE) पुरवावे, २४ तास अथवा सकाळी ६.०० ते रात्री १०.०० पर्यंत शौचालय खुले ठेवावे, शारीरिक दृष्टीने अपंगाकरिता विशेष व्यवस्था (रॅम्प,कमोड/विकलांग खुर्ची) असणे आवश्यक आहे,महिलांच्या शौचालयांमध्ये स्वच्छता नॅपकिन व्हेंडिंग मशीन आणि सेनेटरी नॅपकिन्ससाठी पुरेशी विल्हेवाट यंत्रणा किंवा बायो मेडिकल वेस्ट बिन्स असावेत. १००% प्रभागांमध्ये स्वच्छता असणे. व्यावसायिक ठिकाणी दररोज दिवसातून दोन वेळा रात्रीच्या वेळेसह व रहीवासी भागात दररोज दिवसातून एक वेळा साफसफाई करणे.नेहमी कचरा दिसणा-या ठिकाणाचे कच-याचे रुपांतर (GVP ठिकाण चे सौंदर्यीकरण, शेणखत उचलणे, झोपडपट्ट्यांचे सौंदर्यीकरण, नाल्यांची नियमित साफसफाई, शहरातील जुन्या भागाचे सौदर्यींकरण करणे. सर्व प्रभागातील नाले आणि पाणी संस्था (water bodies) स्वच्छ ठेवणे. प्रत्यक्ष निर्माण होणा-या ओल्या कच-यावर केंद्रीय किंवा विकेंद्रीत पध्दतीने प्रक्रीया करुन त्यापासून तयार झालेल्या खताची विक्री करणे. तरीही स्‍वच्‍छ भारत अभियानामध्‍ये नागरिकांनी सहभागी जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी होऊन अमरावती शहराला स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये जास्तीत जास्त गुणांकन प्राप्त करण्याकरिता सहकार्य करावे असे आवाहन अमरावती महानगरपालिका आयुक्त यांच्या तर्फे करण्‍यात आले आहे.

Related Articles

Back to top button