मराठी

कुस्तीपटू विनेश फोगाटला कोरोना

आशियाई और राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता

नवी दिल्ली/दि.२८– आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती कुस्तीपटू विनेश फोगाटला कोरोना झाला आहे. प्रकृती बिघडल्यामुळे काही दिवसांपूर्वी विनेशनं राष्ट्रीय सराव शिबिरातून माघार घेतली होती. तिला नुकताच खेल रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 2016च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत तिला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती, 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकिट निश्चित करणारी ती भारताची एकमेव महिला कुस्तीपटू आहे. गीता आणि बबिता फोगाट यांच्या पावलावर पाऊल टाकत विनेशनं कुस्तीची निवड केली. तिनं 2014 आणि 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेत अनुक्रमे 48 व 50 किलो वजनी गटाचे सुवर्णपदक जिंकले. 2014 आणि 2018च्या आशियाई स्पर्धेत तिनं अनुक्रमे कांस्य व सुवर्णपदक जिंकले. तिला 2016मध्ये अर्जुन आणि 2018मध्ये पद्म श्री पुरस्कारानं गौरविण्यात आले.

Related Articles

Back to top button