मराठी

चित्रपट प्रदर्शित करण्यात ‘यशराज फिल्म्स’ची आघाडी

मुंबई/दि.२५ – कोरोनाकाळात मनोरंजन क्षेत्राचं मोठं नुकसान झालं. चित्रपटउद्योगालाही कोट्यवधी रुपयांचा फटका बसला. मधल्या काळात कोणतेही बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झालेनाहीत. मात्रआता बॉलिवूडवरील अंधाराचंजाळं फिटू लागलं असून नावाजलेल्या कलाकारांच्या चित्रपटांच्या चित्रपटगृहांमधल्या प्रदर्शनाच्या तारखा ठरल्या आहेत. चित्रपट प्रदर्शित करण्यात ‘यशराज फिल्म्स’नेआघाडी घेतली असून त्यांचे एकूण पाच चित्रपट यंदा प्रदर्शित होणार आहेत. 19 मार्चरोजी अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्रा यांचा ‘संदीप अँड पिंकी फरार’ प्रदर्शित होईल. हा यशराजचाच चित्रपट असून त्यानंतर ‘बंटी और बबली 2’, ‘शमशेरा’, ‘जयेशभाई जोरदार’ आणि ‘पृथ्वीराज’ यांसारखे चर्चेतले चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ‘पृथ्वीराज’ हा अक्षयकुमारचा महत्त्वाकांक्षी चित्रपट असून तोपराक्रमी राजा पृथ्वीराज चौहान यांच्या आयुष्यावर बेतला आहे. यासोबतच अक्षयकुमारचा ‘बेल बॉटम’ही प्रदर्शित होणार आहे. भारताच्या पहिल्यावाहिल्या क्रिकेट विश्वचषक विजयावर आधारित ‘83 ’हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट चार जूनला प्रदर्शित होणार आहे. ‘झुंड’, ‘शेरशाह’, ‘चंडीगढ करे आशिकी’, ‘अतरंगी रे’, ‘भुलभुलैय्या 2’ हेचित्रपटही यंदा प्रदर्शित होणार आहेत. ‘भुलभुलैय्या 2 ’19 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. तिकडे एस एस. राजामौली यांच्या चर्चेत असणार्‍या ‘आरआरआर’च्या प्रदर्शनाची तारीखही ठरली आहे. हा चित्रपट 13 ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये दाखल होईल. कोरोनाकाळात बरेच चित्रपट ओटीटी व्यासपीठांवर प्रदर्शित झाले. यामुळे चित्रपटगृह मालकांना चांगलीच धडकी भरली. सलमान खानने त्यांची चिंता दूर करत ‘राधे’ चित्रपटगृहांमध्येच प्रदर्शित केला जाईल, अशी ग्वाही दिली. त्यानंतर ‘यशराज फिल्म्स’नेपाच चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर केल्यामुळेअनेक निर्मात्यांना दिलासा मिळाला आहे. येत्या काळात इतर काही चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर होऊ शकतात. निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित करण्याची तयारी दाखवल्याने मनोरंजन क्षेत्रात उत्साहाचंवातावरण निर्माण झालंआहे

Related Articles

Back to top button