मराठी
युवा शेतकऱ्याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या
चांदूर बाजार दि.११ – तालुक्यातील बोराळा येथील शेतक:याने आपल्या शेतात सोंगणी करून ठेवलेले सोयाबीन परतीच्या पावसाने सडल्यामुळे युवा शेतक:याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी ४ च्या सुमारास उघड झाली. सुरेंद्र ऊर्फ गणेश वसंतराव इंगोले (३९), असे मृत शेतक:याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार बोराळा येथील शेतकरी सुरेंद्र इंगोले याने आपल्या साडेतीन एकर कोरडवाहू शेतीत त्यांनी यंदा सोयाबीन व तुरीची लागवड केली. दोन तीन दिवसांपूर्वी त्यांनी सोयाबीन सवंगणी करून त्याची शिवारातच गंजी लावली. रविवारी दुपारी ३ च्या सुमारास ते शेतात गेले असता, परतीच्या पावसाने त्यातील काही सोयाबीन सडल्याचे दिसून आल्यामुळे ते विचारमग्न स्थितीत तासाभरात घरी पोहोचले व घरातच विषारी द्रव्य प्राशन केले. कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांना चांदूरबाजार ग्रामीण रुग्णालयात हलविताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचेवर सोसायटी व एका राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्ज होते. सोयाबीन हातचे गेल्याने कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत त्यांनी आत्मघात केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली आहेत. याप्रकरणी चांदूर बाजार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास जमादार विनोद बोबडे करीत आहे.