मराठी

युवा शेतक:याच्या पाण्यात बुडून मृत्यू

मंगरूळ चवाळाची घटना

मंगरुळ चवाळा/दि ७ – मंगरूळ चवाळा येथे शोककळा पसरली आज दुपारी १ वाजता आपल्या शेतातून घरी परत येत असतांना श्री निलेश सुभाष चौधरी वय २४ याच्यावर काळाचा घात झाला आणि त्यात त्याचा जीव गमावल्या गेल्या त्यांच्या मागे आई वडील पत्नी व लहान मुलगी असा आप्त परिवार असुन घरातील कर्ता पुरुष आज आपल्यातुन निघुन गेला सदर घटना मंगरूळ  चवाळा शेत शिवारात घडली मृत युवा शेतकरी आपल्या शेतातून घरी परत असतांना त्याने शेत शिवारात लगत असलेल्या पडीत शेतात शेततलाव आहे त्यात त्याने आपले बैल जोडी पाणी पिण्यासाठी सोडले आणि बैल पाण्यात विश्राती घेत असल्याचे पाहून मृत श्री निलेश सुभाष चौधरी याने आपल्या बैलाच्या अंगावर पाणी टाकावे म्हणून बैलाच्या मागे गेला परंतु आत मध्ये काय घडले कोण जाणे मृत श्री निलेश सुभाष चौधरी हा पाण्यात पडला तो वर आला नाही बराच वेळ झाला आपला मुलगा घरी आला नाही म्हणून शोध घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांना बैल गाडी, बैल, मोबाईल पाण्याच्या बाहेर दिसला परंतु आपला मुलगा कुठे दिसत नाही म्हणून काही गावातील युवक सुद्धा त्याचा शोध घेत होते शेवटी  निलेश हा मृत अवस्थेत पाण्यात दिसला तर लगेच मंगरूळ चवाळा येथिल पोलीस स्टेशन यांना सूचना देण्यात आली तर पोलीस पथक लगेच घटना स्थळी हजर झाले व मृत श्री निलेश सुभाष चौधरी याला पाण्याचा बाहेर काढून मृतदेह नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले पुढील कार्यवाही मंगरूळ चवाळा पोलीस स्टेशन करीत आहे तरी आज संपूर्ण मंगरूळ चवाळा येथे संपूर्ण गाव वासान पडल्यासारखे झाले आहे

Related Articles

Back to top button