-
तरुणीच्या संपर्कामुळे अपहरणाची घटना उघड
अमरावती प्रतिनिधी/ २० :- यवतमाळ येथील एका युवतीचे शहरातून अपहरण करुन तिला अकोला येथे नेले व तेथीलच एका लॉजमध्ये तिला बंदिस्त करुन ठेवल्याचा प्रकार युवतीने तिच्या आईला केलेल्या फोनमुळे उघडकीस आला. परंतू अपहरण करणा-यांना ती ओळखत नसल्याने अपहरण करणा-यांचा काय हेतू असावा याचा पोलीस शोध घेत आहेत.
याबाबत माहितीनुसार, यवतमाळ येथे वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबातील तरुणी स्थानिक एमआयडीसी परिसरातील रहिवाशी असलेल्या तिच्या आत्याकडे नेहमी येत होती. त्यानंतर कुटुंबियांची फोनव्दारे बातचीतही होत होती. दि.२२ ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे तरुणी स्थानिक एमआयडीसी परिसरातील रहिवासी असलेल्या तिच्या आत्याक डे आली. परंतू कुटुंबियांचे तिच्याशी नेहमी होत होते तसे फोनवर बोलणे झाले नाही व अचानक तरुणीने तिच्या आईला फोन करुन कुणीतरी अनोळखी मुलांनी अपहरण करुन अकोला शहरातील बसस्थानक परिसरातील एका लॉजमध्ये बंदिस्त करुन ठेवल्याचे सांगितल्याने आईला धक्काच बसला. अपहरण करणा-यांमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याचे तरुणीने सांगितले. पण ती कोणालाही ओळखत नसल्याने आरोपी बाबत मात्र सांगितले नाही. या घटनेची तक्रार तरुणीच्या आईने काल शनिवारी रात्री राजापेठ पोलिसात दाखल केली. तक्रारीनंतर राजापेठ पोलिसांनी अनोळखी महिला व दोन मुलावर ३६३, ३४२, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला असून शोध घेण्यात येत आहे