मराठी

खासदार भावनाताईंच्या उपस्थितीत शहरातील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

मोठया संख्येत तरुणांनी बांधले शिवबंधन

यवतमाळ/दि,७ – यवतमाळ नगर परीषदेच्या प्रभाग क्रमांक 5 मधील अनेक तरुणांनी खासदार भावनाताई गवळी यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला. विशेष म्हणजे व्यापारी, नागरीक तसेच तरुणांनी आपल्या हाताला शिवबंधन बांधून समाजकारणात उडी घेतली आहे. सतत सुरु असलेल्या शिवसेना प्रवेशाने शिवसैनिक तसेच पदाधिका-यांमध्ये उत्साह संचारला आहे.
शिवसेना ही ऐंशी टक्के समाज  कारण आणि फक्त गरज पडल्यास वीस टक्के राजकारण करते. त्यामुळेच शहरातील तरुणांचा शिवसेना हा पक्ष आकर्षण बनला आहे. सातत्याने शहरातील तरुण शिवसेनेत प्रवेश घेत आहे. नुकताच खासदार भावनाताई गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील तरुण, व्यापारी तसेच नागरीकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. या प्रवेश कार्यक्रम प्रसंगी शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा सह संपर्क प्रमुख संतोष ढवळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे यवतमाळ शहर प्रमुख पिंटु बांगर यांनी केले. खासदार भावनाताई गवळी यांच्या जनसंपर्क कार्यालयात प्रवेश घेणा-या तरुणांच्या हाताला शिवबंधन बांधण्यात आले. प्रवेश घेणा-या तरुणांनी आपण नागरीकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगीतले. या प्रसंगी प्रभाग क्रमांक 5 मधील लखन शेंदरे, आर्चीक पाखरे, गणेश घोंगडे, अर्जुन गुंजाळ, रुषीकेश भस्मे, श्याम चौधरी, यश सहारे, साई अड्डलवार, यश पांडे, मधुकर आत्राम, नितीन इंगळे, सागर किनगावकर, यशवंत पवार, रोशन तुरोने, पवन, सुशील करमनकर, सौरभ नागभिडकर तसेच प्रभाग क्रमांक 9 मधील शेख इब्राहीम शेख, सय्यद हसन सय्यद उस्मान, राहील शेख, इकबाल शेख, जिशान अहमद, आकाश, शुभम कळसाईत, सतिश निकम, राहुल आकळे सह अनेक तरुणांना खासदार भावनाताई गवळी, संतोष ढवळे तसेच शिवसेना शहर प्रमुख पिंटु बांगर यांनी शिवबंधन बांधले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता भूषण काटकर, आकाश जाधवर, अक्षय पाखरे, पवन कुर्वे, नासीर भाई यांनी परीश्रम घेतले.

शिवसेना आनखी प्रबळ करणार

शिवसेनेच्या सामाजिक कार्यामुळे प्रामुख्याने तरुणांचे आकर्षण वाढले असून ते शिवसेनेत प्रवेश घेत आहे. यवतमाळ जिल्हयात शिवसेना आनखी प्रबळ करण्याचे आमचे ध्येय आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्याच्या प्रत्तेक भागात शिवसेनेच्या शाखा काढण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहे.

भावनाताई गवळी
खासदार, यवतमाळ-वाशिम

Related Articles

Back to top button