वरुड/ ४ डिसेंबर- येथून जवळच असलेल्या टेंभुरखेडा येथील युवा संत्रा व्यापा:याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याने संपुर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे. मोरेश्वर देशमुख असे त्या संत्रा व्यापा:याचे नांव आहे.
टेंभुरखेडा येथील रहिवाशी असलेले मोरेश्वर अण्णा देशमुख (३६) हे संत्रा व्यापारी म्हणुन गेल्या अनेक वर्षांपासुन कार्यरत होते. गेल्या काही वर्षांपासुन त्यांनी संत्र्याच्या व्यवसायातून ब:यापैकी मिळकत सुध्दा प्राप्त केली होता. अशा स्थितीत मोरेश्वर यांनी आज दुपारी ४.३० च्या सुमारास टेंभुरखेडा येथील त्यांच्या निवासस्थानी विषारी औषध प्राशन केले. मोरेश्वर यांनी विष घेतल्याचे लक्षात येताच नातेवाईक व गावक:यांनी त्यांना तातडीने वरुडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. अत्यंत सुस्वभावी आणि तत्पर अशा व्यक्तीमत्वाचे धनी असलेले मोरेश्वर देशमुख यांच्या निधनाचे वृत्त टेंभुरखेडासह तालुक्यात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
मोरेश्वर देशमुख यांना संत्रा व्यवसायामध्ये घाटा आल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा सद्य: सुरु आहे. त्यांच्या मागे वडिल, पत्नी, २ मुले, १ मुलगी, भाऊ असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. उद्या सकाळी ११ वाजता त्यांच्या मृतदेहावर टेंभुरखेडा येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. याप्रकरणी वरुड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.