दुचाकी स्वस्त होण्याचे संकेत
नवीदिल्ली/दि. २६ – कोरोना(Corona) विषाणूमुळे केवळ देशच नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेचेही मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी वाहन क्षेत्रातील मंदी दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तसे झाले, तर दुचाकी(Two Wheeler) दहा हजारांनी स्वस्त होतील, असे राजीव बजाज यांनी म्हटले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण(Nirmala Sitaraman) यांनी दुचाकीवरील जीएसटी कमी होण्याचे संकेत दिले आहेत. सीआयआयच्या व्यासपीठावर दुचाकी वाहनांवरील जीएसटी कमी करण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सीतारामण यांनी म्हटले, की ही उत्तम सूचना आहे. कारण दुचाकी वाहन लक्झरी qकवा सिगारेट, दारू नाही. जीएसटी(GST) परिषदेत या विषयावर विचार केला जाईल. हा प्रस्ताव अगोदर जीएसटी फिटमेंट समितीकडे पाठवावा लागेल आणि तो त्वरित आणण्याची शक्यता नाही. २७ ऑगस्ट रोजी जीएसटी परिषदेची बैठक होणार आहे; परंतु त्यात लगेच निर्णय होण्याची शक्यता नाही; मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जीएसटी परिषदेची पुढची बैठक १५ सप्टेंबर रोजी होणार आहे. तीत फिटमेंट कमिटीच्या प्रस्तावावर चर्चा होऊ शकेल. त्याअगोदर फिटमेंट कमिटीला दुचाकी वाहनात जीएसटी कमी करण्याची शिफारस करावी लागेल. त्यानंतर जीएसटी कमी करायचा, की नाही याचा निर्णय जीएसटी परिषद घेईल.