पवनी (स.) फिडरमध्ये सिंगल फेज सुरु

शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकत्र्यांची मागणी मान्य

वरुड/दि. १९ – आमदार देवेंद्र भुयार यांच्या अथक पाठवुराव्यानेे राजुरा बाजार विद्युत केंद्रातील पवनी फिटर येथील शेतातील सिंगल फेज सुरु झाला आहे.
उपकार्यकारी अभियंता राजेश दाभाडे, सहाय्यक अभियंता अंकुश पेटले, वरीष्ठ तंत्रज्ञ मुंजाजी मुंडे यांना आमदार देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते गणेश चौधरी, सागर राऊत, कुमार पडोळे, ऋषिकेश राऊत, राजेश साबळे, अमोल वाघ, राजेश धोटे, किशोर हेलोडे यांनी केलेल्या पाठपुराव्याची अधिका:यांनी दखल घेतली आणि अखेर सिंगल फेज सुरु झाल्याने सर्व शेतक:यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
राजुरा बाजार विद्युत केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचा:यांचे शेतक:यांनी आभार मानले आहेत.

Back to top button